VTBM २०२६ साठी नोंदणी करा
५–१२ नोव्हेंबर २०२६ · मोफत · लहान मुले आणि नवशिक्यांसह सर्व स्तरांतील पक्षीप्रेमींसाठी.
१
नोंदणी करा
खालील छोटा फॉर्म भरा: ईमेल, नाव आणि नैतिक पक्षीनिरीक्षणाची शपथ.
२
टेकडीवर पक्षीनिरीक्षण करा
५–१२ नोव्हेंबरदरम्यान कोणत्याही दिवशी, सकाळी ५ ते संध्याकाळी ७. एकटे किंवा जास्तीत जास्त चार जणांच्या गटात.
३
ई-बर्डवर नोंद करा
वेताळ टेकडीच्या चारपैकी एका हॉटस्पॉटवर पूर्ण चेकलिस्ट सादर करा. शक्य तिथे फोटो किंवा ध्वनिमुद्रण जोडा.
४
शेअर करा
प्रत्येक चेकलिस्ट आणि ट्रिप रिपोर्ट ई-बर्ड आयडी vtbm2026 सोबत शेअर करा. हीच तुमची प्रवेशिका.
नियम थोडक्यात
- फक्त सकाळी ५ ते संध्याकाळी ७, ५–१२ नोव्हेंबरदरम्यान पक्षीनिरीक्षण.
- ग्राह्य ई-बर्ड हॉटस्पॉट: वेताळ टेकडी (ARAI जवळ), पंचवटी, म्हातोबा टेकडी, बावधन टेकडी.
- फक्त पूर्ण (complete) ई-बर्ड चेकलिस्ट ग्राह्य, आणि त्याही ई-बर्ड परीक्षकांनी आक्षेप न घेतलेल्या.
- एकटे किंवा १–४ जणांचा गट. गटातील किमान एकाला परिसराची माहिती असावी.
- फोटो आणि ध्वनिमुद्रण स्वतःचे असावे. AI-निर्मित माध्यम चालणार नाही.
- दोन गट: सर्वोत्तम चेकलिस्ट आणि सर्वोत्तम ट्रिप रिपोर्ट.
नैतिक पक्षीनिरीक्षणाची शपथ
- असलेल्या पायवाटेवरच चालेन; गवत किंवा झुडपे तुडवणार नाही.
- पक्ष्यांचे आवाज वाजवणार नाही, आमिष दाखवणार नाही.
- घरटी आणि विसावलेल्या पक्ष्यांपासून दूर राहीन.
- सर्व कचरा परत घेऊन जाईन.
- स्वेच्छेने आणि स्वतःच्या जबाबदारीवर सहभागी होईन.
नोंदणी फॉर्म
हा फॉर्म गूगल फॉर्म्सवर आहे. VTBM तुमचा ईमेल फक्त मॅराथॉनविषयी माहितीसाठी वापरते. फॉर्म इंग्रजीत आहे.
नोंदणी फॉर्म उघडामित्रांनाही बोलवा
व्हॉट्सॲपवर शेअर कराई-बर्ड नवीन आहे? सुरुवात येथून करा: ई-बर्ड इंडियाचे मार्गदर्शक.प्रश्नांसाठी: vetaltekdibm@gmail.com · रणजित राणे, +91 74200 71818